दक्षिण कर्नाटकाला मिळणाऱ्या सुविधा उत्तर कर्नाटकाला न देता सापत्नभावाची वागणूक देणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात कित्तूर कल्याण कर्नाटक सेना पक्ष जनतेचा आवाज म्हणून काम करेल, असे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धनगौडा पाटील यांनी सांगितले.

कित्तूर कल्याण कर्नाटक सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धनगौडा पाटील म्हणाले, दक्षिण कर्नाटकाला मिळणाऱ्या सुविधा उत्तर कर्नाटकाला न देता भेदभाव केला जात आहे. अनेक आंदोलने झाली, तरी विधानसभेत यावर चर्चा झाली नाही. सुवर्णसौधमधील अधिवेशन केवळ निषेधापुरते मर्यादित आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील समस्यांचा आवाज म्हणून हा पक्ष काम करेल. सुवर्णसौधमधील अधिवेशन केवळ औपचारिकता आहे. सुवर्णसौधमध्ये सरकारची प्रमुख कार्यालये स्थलांतरित व्हायला हवीत. तरुणांसाठी रोजगार निर्माण व्हायला हवा, यासह इतर मागण्या पूर्ण व्हायला हव्यात.
कित्तूर कल्याण कर्नाटक सेना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अन्नपूर्णा निर्वाणी म्हणाल्या, उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कित्तूर कर्नाटक कल्याण सेना पक्ष स्थापन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले जात आहे. लोकप्रतिनिधी जनतेच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत. बसवण्णांच्या काळापासून सर्व काही आंदोलनाद्वारेच मिळवावे लागले आहे. स्वतंत्र राज्यासाठीही आम्ही तयार आहोत. लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करून, जनतेचा आवाज म्हणून हा पक्ष काम करेल. महिलांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
Recent Comments