लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त अभियानांतर्गत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे १७ आणि १८ मे रोजी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. दीक्षित हे डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेतून जीवनशैलीवर आधारित मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेल्या लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त अभियानाच्या अंतर्गत, डॉ. जगन्नाथ दीक्षित १७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता शहापूरमधील गोवाज लेकव्यू हॉस्पिटलजवळ असलेल्या श्री चिदंबर राजाराम महाराज आणि पांडुरंग महाराज समाधी मठाच्या सभागृहात व्याख्यान देणार आहेत.
हे व्याख्यान मराठी भाषेत होणार असून, सर्वांसाठी विनामूल्य आहे. तसेच, एचबीए१सी (HbA1c) तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैली मार्गदर्शन आणि मधुमेह केंद्र, विशाल इन्फ्राबिल्ड, जयगणेश, १ला क्रॉस, गोडसेवाडी, टिळकवाडी, बेळगाव येथे संपर्क साधता येईल.
Recent Comments