संतिबस्तवाड गावात मशिदीतून धर्मग्रंथ आणून जाळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाजाने बेळगाव बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावातील मशिदीतून धर्मग्रंथ आणून जाळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाजाने बेळगाव बंद पुकारला आहे. बेळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठा, ज्यात खडे बाजार, दरबार गल्ली, भेंडी बाजार, आझम नगर, आझाद नगर, गांधी नगर आणि इतर भागांचा समावेश आहे, या ठिकाणी सकाळपासूनच व्यापार बंद आहे.
धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणी आरोपीला तीन दिवसांच्या आत अटक करण्याची मुदत देण्यात आली होती. आज मुस्लिम समाज शहरात निदर्शने करणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
Recent Comments