चिकोडी शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील बेपारी गल्ली परिसरात सिमेंट काँक्रीट (CC) रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. नगरपालिका सदस्य गुलाब हुसेन बागवान यांच्या या कामाला सुरुवात झाली.

बेपारी गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते आणि गटारींची सोय नसल्याने स्थानिक रहिवाशांना पावसाळ्यात तसेच इतर वेळीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका सदस्य गुलाब बागवान यांच्याकडे निवेदने देऊन तातडीने रस्ते आणि गटारींची सोय करण्याची मागणी केली होती.
स्थानिकांच्या या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत गुलाब हुसेन बागवान यांनी पाठपुरावा केला. आमदार गणेश हुक्केरी आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्याक विभागाने मंजूर केलेल्या विशेष निधीतून या सिमेंट रस्ता कामाला मंजुरी मिळाली. आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरपालिका सदस्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी बोलताना नगरपालिका सदस्य गुलाब हुसेन बागवान म्हणाले की, माझ्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बेपारी गल्लीतील रहिवाशांना रस्ते आणि गटारी नसल्याने खूप त्रास होत होता. त्यांची ही जुनी मागणी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि आज या कामाला सुरुवात झाली आहे.
यावेळी शकील बेपारी, अरीफ बेपारी, फाजुला बेपारी, सलीम पेंदारी, रफीक चौधरी, माजिद चौधरी, मैन्नू बेपारी, खलील बेपारी, इस्माईल बेपारी, अनिस बेपारी, खालिद बेपारी, रियाज बेपारी, इजाज बेपारी, हसन बेपारी, अमीन बेपारी, मकबूल बेपारी, अजीज बेपारी यांच्यासह इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments