Belagavi

पाणीटंचाईसंदर्भात सवसुद्दी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

रायबाग तालुक्यातील सवसुद्दी ग्रामपंचायतीने गावात वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करत येथील ग्रामस्थांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने गावातील दोन मोठे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी, गावातील बहुतांश बोअरवेल्स व इतर जलस्रोतही कोरडे पडले आहेत. गावात बहुग्राम पाणीपुरवठा योजना अस्तित्वात नाही, तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामेही अद्याप अपूर्ण आहेत.

या परिस्थितीमुळे गावातील नागरिक आणि जनावरे दोघांनाही पिण्याच्या पाण्याचा तीव्र अभाव भासत आहे. सध्या दैनिक किमान १० ते १२ टँकर ट्रिप्सची आवश्यकता असून, ग्रामपंचायतीकडे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या निवेदनात, पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून तातडीने टँकरची संख्या वाढवावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Tags: