खानापूर येथील हारीश या तरुणाने अल्पवयात हज यात्रा पूर्ण करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. धार्मिकतेच्या मार्गावर चालत त्याने इतर तरुणांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे.

आजच्या काळात अनेक तरुण वाईट सवयींच्या आहारी जात असताना, हारीशने आपल्या आचरणातून वेगळी वाट दाखवली आहे. त्याच्या या धार्मिक प्रवासाचे कौतुक करत ज्येष्ठ मुस्लिम समाज नेते महम्मद इक्बाल बसरीकट्टी यांनी त्याचा सत्कार केला. त्यांनी हारीशला शाल व पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिलं.
या प्रसंगी जंगलीसाहेब नदाफ व इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments