एसएसएलसी उर्दू विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खानापूर तालुक्यातील अनहा तिगडी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. युवाकाँग्रेस अध्यक्ष इसाक खान पठाण यांनी तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

खानापूर तालुक्यातील बाशिबान हायस्कूलची विद्यार्थिनी अनहा फयाज तिगडी हिने एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी तब्बल ६१३ गुण मिळवत उर्दू माध्यम शाळांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल खानापूर तालुका युवाकाँग्रेस शहराध्यक्ष इसाक खान पठाण यांनी अनहाचा आत्मीय सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. इसाक खान पठाण यांनी या प्रसंगी बोलताना म्हटलं की, अनहाने मिळवलेलं हे यश केवळ तिचं नाही, तर संपूर्ण खानापूर तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारं आहे.
या सत्कार प्रसंगी खानापूर नगरपंचायतीच्या सदस्या फातिमा बेपारी आणि युवाकाँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.
Recent Comments