Bailahongala

मलप्रभा नदीत प्लास्टिक कचरा टाकू नये, मैत्र मंडळाचं जनजागृती अभियान

Share

कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर बैलहोंगल येथील मैत्र मंडळाने प्लास्टिकमुक्त मलप्रभा जनजागृती अभियानांतर्गत मलप्रभा नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली.


तालुक्यातील मलप्रभा नदी प्लास्टिकसह विविध प्रकारच्या कचऱ्यांमुळे प्रदूषित झाली होती. या पार्श्वभूमीवर बैलहोंगल येथील मैत्र मंडळाने प्लास्टिकमुक्त मलप्रभा नदी या घोषणेखाली मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांच्या सहभागाने कचरा स्वच्छ करून जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं.

वाणिज्य कर उपआयुक्त बाळेश संपगावी, वक्कुंद मुरारजी निवासी शाळेचे प्राचार्य ईरण्णा मुनवळी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Tags: