बेळगावमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या संविधान वाचवा मेळाव्यात भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणांसह संविधान वाचवा आंदोलनाचे आयोजन आज बेळगावमध्ये सीपीएड मैदानावर करण्यात आले होते. काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या मेळाव्यादरम्यान भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ माजविण्यास सुरुवात केली. दरम्यान या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचे भाषण सुरु होताच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी पोहोचून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस आणि भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह मंत्री, आमदारांनीही या मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान हा गोंधळ सुरु होताच पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात बसवताच इतर कार्यकर्त्यांनी पोलीस वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक घडली. यादरम्यान पोलिसांनी लाठीचा हिसका दाखवत महिला कार्यकर्त्यांना बसमधून सुरक्षितपणे रवाना केले.
Recent Comments