Belagavi

कॅन्सर वॉरियर्सचा शांताई वृद्धाश्रमात सन्मान

Share

बेळगाव शहरातील अपर्णा खानोलकर व त्यांच्या ‘पिंक वॉरियर्स’ टीमने शांताई वृद्धाश्रमात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम घेतला. स्वतः कॅन्सरवर मात केलेल्या या महिलांनी नाटकाच्या माध्यमातून वृद्ध महिलांना कॅन्सरबाबत जागरूक करत समाजाला सकारात्मक संदेश दिला.

बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रमामध्ये कॅन्सरवर मात केलेल्या अपर्णा खानोलकर आणि त्यांच्या ‘पिंक वॉरियर्स’ संघटनेतर्फे एक प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात वृद्ध आजींना कॅन्सरविषयी प्रिकॉशन घेण्याची गरज आणि उपाय याबाबत नाटकाच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

अपर्णा खानोलकर स्वतः ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून मरणाच्या दारातून परत आलेल्या आणि आता समाजासाठी प्रेरणा देणारे कार्य करत आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवणे, उपचारांच्या काळातील स्वतःचे अनुभव शेअर करून मानसिक बळ देणे, असे कार्य ‘पिंक वॉरियर्स’तर्फे सुरू आहे.

कार्यक्रमात सहभागी असलेल्या आजी-आजोबांनी कॅन्सर वॉरियर्सना आशीर्वाद दिले.

महापौर विजय मोरे यांनी सांगितले की, तालुक्यातील इतर कॅन्सर वॉरियर्सना शोधून त्यांच्या सन्मानासाठी स्वतंत्र कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईल. तसेच, कॅन्सरवरील उपचार देणाऱ्या डॉक्टरांचाही या कार्यक्रमात गौरव केला जाईल.

या कार्यक्रमात शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष आणि महापौर विजय मोरे यांच्या हस्ते अपर्णा खानोलकर आणि इतर कॅन्सर वॉरियर्स यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विजय पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: