अखेर बेळगावकरांचे बहुप्रतिक्षित कला मंदिर आधुनिक मार्केटच्या रूपात निर्माण झाले असून लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. येत्या एप्रिल २० रोजी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

बेळगावच्या टिळकवाडीतील कला मंदिराला नव्याने रूप देण्यात आले असून, आता हे ठिकाण आधुनिक मार्केटमध्ये रूपांतरित झाले आहे. गेल्या एक वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून, अखेरीस लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या एप्रिल २० रोजी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.
जुन्या कला मंदिराचे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडकडे हस्तांतरण केल्यानंतर मे २७, २०१९ रोजी इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर ४६.६८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी यांकी कन्स्ट्रक्शनने केली.
तळमजला, बेसमेंटसह मल्टिपल कार पार्किंग, व्यावसायिक दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मीटिंग हॉल, व्यापारी संकुल, ऑटो रिक्षा आणि सायकलींसाठी मल्टी-मोडल पार्किंग स्टँड, आधुनिक दुकाने, कौटुंबिक मनोरंजनासाठी जागा, लघु सभागृह, सांस्कृतिक केंद्र अशा अनेक वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे. येत्या एप्रिल २० रोजी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
Recent Comments