सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीस तब्बल ७० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता करत वीरगोट्ट येथील अडविलिंग स्वामीजींनी ४.५ लाख रुपये किमतीची सुवर्णलेपित साडी देवीच्या चरणी अर्पण केली आहे.

ही साडी अर्पण करण्यामागे तब्बल ७० वर्षांपूर्वीचा एक धार्मिक संकल्प होता. जंबगी येथील प्रभुदेव डोंगरावर वसलेल्या शिवयोगीश्वरांच्या प्रेरणेने हा संकल्प करण्यात आला होता. आता तो संकल्प पूर्ण करत स्वामीजींनी यल्लम्मा देवीला साडी अर्पण केली. देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सर्व लोकांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थनाही यावेळी केली.
Recent Comments