Uncategorized

नंदगड यात्रोत्सवात सहकार्य केल्याबद्दल संतोष दरेकर यांचा सन्मान

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील श्री महालक्ष्मी यात्रेत सहकार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांना सन्मानित करण्यात आले.

२४ वर्षांनंतर नंदगड येथे श्री महालक्ष्मी यात्रा भरविण्यात आली होती. सदर यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले. अशा अनेक मान्यवरांचा महालक्ष्मी यात्रा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यात्रा समितीचे सदस्य, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: