बेळगाव – शहरातील शहापूर पोलिसांनी हुलबत्ते कॉलनीतील एका घरावर छापा टाकून गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या धाडीत 1,37,681 रुपयांच्या किंमतीच्या विविध कंपनींच्या 313.3 लिटर दारू बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाद्वार रोड येथील रहिवासी सुभाष सुधीर डे याने गोवा राज्यातून कमी किमतीत दारू खरेदी करून, ती जास्त किमतीत विकण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरातील शहापूर येथील हुलबत्ते कॉलनीत असणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या घरी कोणतीही परवानगी किंवा परवाना न घेता बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती.
मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यान्ग, उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त निरंजन राज अर्स, मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून ही कारवाई केली.
धाड पथकात नागराज ओसप्पगोल, संदीप बागडी, जगदीश हाडिमणी, श्रीधर तळवार, श्रीशैल गोवावी, सुरेश लोकुरे, अजीत शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड आणि विजय कमते या पोलिसांचा समावेश होता.
या कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी धाडसी पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments