खानापूर तालुक्यातील कौंदल गावातील एका घरावर वनविभागाने छापा टाकून बेकायदेशीररित्या ठेवलेले वन्य मेंढीचे मांस, एक बंदूक, तसेच चाकू व कोयता अशी शस्त्रे जप्त केली आहेत.

कौंदळ येथील सुशांत पाटील यांच्या घरावर वनविभागाच्या पथकाने धाड टाकून 3.04 कि.ग्रॅ. वजनाचे शिजवलेले व कच्चे वन्य मेंढीचे मांस, एक बंदूक, तसेच चाकू व कोयता जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई खानापूर वनक्षेत्र अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून खानापूर परिक्षेत्र वनसंरक्षक अधिकारी सुनीता निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
धाडीत वापरण्यात आलेली शस्त्रे आणि मांस जप्त करून आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईत डी.आर.एफ.ओ. देवमाणे आणि अन्य अधिकारी सहभागी झाले होते.


Recent Comments