आधीच दूध, वीज आणि खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या बेळगावकरांवर शालेय फी वाढीने त्रस्त केले आहे. खासगी शाळांच्या फीमध्ये अचानक वाढ केल्याने संतापलेल्या पालकांनी वनीता विद्यालय या खासगी शाळेला घेराव घातला.
शाळेच्या प्रवेश फीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाढ केल्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. ‘डोनेशन कमी करू’ असं म्हणणाऱ्या व्यवस्थापनाने आता उलट फी वाढवली असून, पालकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
पालकांचे म्हणणे आहे की, दर तीन वर्षांनी 2000 रुपये इतकी फी वाढवली जात असे, परंतु यावर्षी ती एकदम 5000 रुपये वाढवण्यात आले. एका घरातील दोन-तीन मुले शाळेत शिकत असल्यास हे आर्थिक ओझं कसं सोसायचं, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. याबाबत प्रश्न विचारल्यावर हा तुमचा नाही, शाळेच्या व्यवस्थापनाच्या “ अंस्तित्वाचा प्रश्न असे उत्तर दिलले जात आहे. यामुळे पालकांमध्ये अधिक असंतोष पसरला आहे.
“जर व्यवस्थापन असे निर्णय घेत असेल, तर त्यांनी पालकांना विश्वासात घ्यायला हवं. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा पालकांनी दिला आहे.
शाळेच्या प्राचार्य जोसफिन गुन्टी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “पालकांनी फी वाढीविरोधात आपली नाराजी व्यक्त केली असून ती आम्ही व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. नवीन प्रवेशांसाठी डोनेशन रद्द करून केवळ फी आकारली जात आहे आणि इतर शाळांच्या तुलनेत आमचे शुल्क कमी आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हा विषय सध्या संपूर्ण बेळगावमध्ये चर्चेचा विषय बनला असून पालक आपल्या मुलांच्या शिक्षण हक्कासाठी समर्थपणे उभे आहेत.


Recent Comments