बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सिटीस -2 योजनेसाठी फ्रान्स, जर्मनी आणि केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने बुधवारी बेळगाव महापालिकेला भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला.
बेळगाव स्मार्ट सिटी सिटीस -2 प्रकल्पाच्या अनुषंगाने, फ्रान्स, जर्मनी तसेच केंद्र सरकारचे अधिकाऱ्यांच्या पथकाने बेळगाव महापालिकेला भेट देऊन, स्मार्ट सिटी कार्यालयात महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी बेळगाव शहराची सद्यस्थिती, तसेच घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा यावर सविस्तर माहिती दिली. महापौरांनी सध्या सुरु असलेल्या कामांची माहिती देत, भविष्यातील विकास आराखड्यांची रूपरेषा मांडली. बैठकीनंतर पथकाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली.

अवघ्या आठ महिन्यांत शहरात व कचर्याच्या व्यवस्थापनात घडवलेल्या बदलांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. त्यानंतर सदाशिवनगरमधील गॅरेज आणि ओला कचरा संकलन केंद्र, तसेच खासबाग बायोगॅस प्रकल्प व डेल नल्म सेंटरलाही भेट दिली.

या शिष्टमंडळातील फॅब्रिस जुक्वा, टीम टास्क लीडर (फ्रान्स), जस्टिन प्लूर्ड-डहॉमॉन्ट, पर्यावरण व सामाजिक तज्ज्ञ (फ्रान्स), रजनीश आहुजा, प्रमुख – नागरी विकास (भारत), नितीश चंद्राकर, सेक्टर पोर्टफोलिओ व्यवस्थापक (भारत),. अमित गोस्वामी, पर्यावरण व सामाजिक सल्लागार (भारत), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स चे नैम केरुवाला, कार्यक्रम संचालक, सिटीस, उमा पांडे, कार्यक्रम अधिकारी, सिटीस, डॉ. मोहम्मद आरिफ, पर्यावरण व सामाजिक तज्ज्ञ, सिटीस, महापालिका आयुक्त, स्मार्ट सिटी व्यवस्थापक, अभियंते व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments