कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावात दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उगार बुद्रुक येथील एसएसएलसीमध्ये शिक्षण घेत असलेला अयान दादापीर नेजकर या युवकाचा दुचाकी अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आयांच्या पश्चात आई-वडिलांसह एक लहान भाऊ आहे. गुरुवारी उगार बुद्रुक येथील रुद्रभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Recent Comments