बेळगाव पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरावर आज दुसऱ्या समुदायातील त्याच तरुणाने दुसऱ्यांदा दगडफेक केली.
काल रात्री, बेळगावातील उज्वलनगर येथील यासिर नरसदी या 19 वर्षीय दुसऱ्या समुदायातील तरुणाने बेळगावातील पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरावर दुसऱ्यांदा दगडफेक केली. स्थानिकांनी त्याला ताबडतोब पकडले, आणि चांगलेच बदडले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंदिरावर दगड फेकणारा तरुण यासिर हा मानसिक आजारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दक्षिण भारतातील एकमेव श्री अश्वत्थामा मंदिरावर दगडफेकीची बातमी कळताच, हिंदू तरुणांनी घटनास्थळी गर्दी केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यासिरविरुद्ध मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराशेजारी केएसआरपी पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे आणि मार्केट पीआय आणि पीएसआयच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments