बेळगाव शहरातील धर्मनाथ भवन परिसरात एका तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरातील धर्मनाथ भवन परिसरातील एका खासगी पीजीमध्ये राहणाऱ्या प्रज्वल कुप्पानट्टी (वय २०) या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रज्वल हा मूळचा रायबाग तालुक्यातील बावनसवदत्ती गावचा रहिवासी होता. तो सध्या बेळगावमधील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. चंद्रकांत यांच्या देखरेखीखालील पि.जी.मध्ये तो वास्तव्यास होता.
मानसिक ताणतणाव आणि नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूची खबर मिळाल्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या प्रकरणाचा पुढील तपास माळमारुती पोलीस करत आहेत.


Recent Comments