द्वितीय पीयूसी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या पार्श्वभूमीवर खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार जारकीहोळी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, बेळगाव जिल्ह्याने ६५.३७ टक्के निकालासह राज्यात २६वे स्थान तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने ६६.७६ टक्के निकालासह २४वे स्थान पटकावले आहे. ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फलित आहे. त्याचबरोबर, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी धीर देत हे तुमच्या जीवनाचं नव्हे, केवळ एका वर्षाच्या अभ्यासाचं मूल्यांकन आहे. त्यामुळे खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे चालत राहा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.


Recent Comments