चिक्कोडी तालुक्यातील माजलट्टी येथील सरकारी पीयू महाविद्यालयातील विद्यार्थिनी कावेरी मलपूरे हिने द्वितीय पीयूसी परीक्षेतील कला शाखेत ५९४ गुण मिळवून राज्यात पाचवे स्थान पटकावले आहे.

कावेरी मलपूरे हिने द्वितीय पीयूसी परीक्षेत मराठी – ९९, इंग्रजी – ९७, अर्थशास्त्र – १००, इतिहास – ९९, राज्यशास्त्र – ९९ आणि समाजशास्त्र – १०० असे एकूण ५९४ गुण मिळवले आहेत. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. तिच्या यशाबद्दल आमदार दुर्योधन ऐहोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आनंद कोळी, शिक्षणप्रेमी रुद्रप्पा संगप्पगोळ आणि उपप्राध्यापकांनी अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Recent Comments