शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर द्वितीय पीयूसी चा निकाल जाहीर केला. निकालात उडुपी जिल्हा पहिल्या तर बेळगाव राहिले 26 व्या स्थानावर राहिल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा राज्यात एकूण 73.45% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. उडुपी जिल्ह्याने सर्वाधिक 93.90% निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर दक्षिण कन्नड जिल्हा 93.57% निकालासह दुसऱ्या स्थानावर आहे. बेंगळुरू दक्षिण (85.36%), कोडगु (83.84%), बेंगळुरू उत्तर (83.31%), आणि उत्तर कन्नड (82.93%) या जिल्ह्याचाही उत्तम निकाल लागला.
दुसरीकडे, बेळगाव जिल्ह्याने 65.37% निकालासह राज्यात 26 वे स्थान मिळवले आहे. यादगिरी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर असून, केवळ 48.45% निकाल लागला आहे.
या परीक्षेसाठी एकूण 6,37,805 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 4,68,439 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल 53.29% लागला. वाणिज्य शाखेचा निकाल 76.07% तर विज्ञान शाखेचा 82.54% टक्के निकाल लागला.
Recent Comments