Belagavi

समर्थ महिला मंडळ तर्फे चैत्रागौरी हळदीकुंकू समारंभ उत्साहात

Share

हिंडलगा, लक्ष्मी नगर ,येथील समर्थ सोसायटीमध्ये, समर्थ महिला मंडळातर्फे चैत्रागौरी हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या नूतन कार्यकारणी चा स्वागत समारंभ व पूर्व कार्यकारणीचा निरोप समारंभ याने झाली .यावेळी मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ स्नेहा दळवी यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल आपले विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये नूतन अध्यक्षा सौ नीला पाटणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व सदस्यांना बरोबर घेऊन ,पुढील सर्व वार्षिक कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी मंडळाच्या नूतन उपाध्यक्ष सौ अश्विनी देसाई, कार्यवाहक सौ बिना धामणेकर व खजिनदार सौ कृतिका मोडक यांनीही आपापले विचार व्यक्त केले. यावेळी सर्व आजी व माजी सदस्य तसेच ‘आदर्श शिक्षिका पुरस्कृत ‘सौ भारती औंधकर या सर्वांचा भेट वस्तू देऊन सत्कार तसेच अभिनंदन सोहळा पार पडला.

सौ रंजना परब यांनी चैत्रागौरी हळदीकुंकू बद्दलची माहिती दिली. नूतन अध्यक्ष सौ नीला पाटणेकर यांनी संत एकनाथ महाराज यांचे भारुड सादर केले . सौ भारती औंधकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता डाळ कैरी कोशिंबीर व आंब्याचे पन्हे यांनी झाली. समर्थ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी यामध्ये उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Tags: