Belagavi

भाजप स्थापना दिनी बेळगाव दक्षिणमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून सुशोभीकरणाचे काम हाती

Share

आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिण भागात भाजप कार्यकर्त्यांकडून सुशोभीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज विशेष उत्साह पाहावयस मिळाला. काल रात्रीपासूनच स्थापना दिवस साजरा करण्यासाठी तयारी चालली होती. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोवावेस चौकात भाजपचे ध्वज लावून परिसर सुशोभित करण्यात आला.

या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये पक्षाप्रति असणारा अभिमान आणि प्रेम पहावयास मिळाले. स्थापणादिन कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Tags: