Belagavi

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात भव्य बाईक रॅली

Share

आज भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त महिला आणि पुरुषांसाठी बाईक रॅली काढण्यात आली. ‌

हेल्मेट परिधान करा आणि जीव वाचवा. रक्तदान करा आणि जीव वाचवा. “पाणी वाचवा, निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा, पृथ्वी वाचवा” या घोषणेसोबतच भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश देण्यात आला.शहरातील सीपीईडी मैदानावर सकाळी आयपीएस अधिकारी डीसीपी रोहन जगदीश, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, ज्येष्ठ वकील रविराज पाटील, राजेंद्र जैन, मनोज संचेती, राजेंद्र जक्कनवर, हिराचंदा कलामणी आदींनी बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

ही रॅली सदाशिव नगर जैन मंदिर, आंबेडकर रोड, राणी चेन्नम्मा सर्कल, कॉलेजरोड, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, कलमठ गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड, अनंतशयन गल्ली, कपिलेश्वरनगर मार्गे पुढे निघाली.R.P.D रोड, महावीर भवन येथे पोहचून याची समाप्ती झाली. या रॅलीमध्ये सुमारे एक हजार दुचाकीस्वार सहभागी झाले होते.श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सदाशिव नगर यांनी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Tags: