Belagavi

बिम्स रुग्णालय अंधारात : टॉर्चच्या प्रकाशझोतात विषप्राशन केलेल्या व्यक्तीवर केले गेले उपचार

Share

बेळगावच्या बीन्स इस्पितळात काल रात्री अचानक वीस मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला यामुळे बीम्स इस्पितळ अंधारात गेले. डॉक्टर्सना आणि रुग्णांना याचा खूपच त्रास झाला.

बेळगावचे बिम्स रुग्णालय हे नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. काल रात्री सुमारे 20 मिनिटे वीजपुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले. यामुळे आयसीयू आणि आपत्कालीन विभागासह संपूर्ण रुग्णालयात रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर्स आणि परिचरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर औषध-उपचार करावे लागले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. विष पिऊन आलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू असतानाच वीज गेल्याने डॉक्टरांना नाहक अडचणींचा सामना करावा लागला. विषप्राशन केलेल्या त्या व्यक्तीवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उपचार करावे लागले.

वीज गेल्यानंतर बॅकअप व्यवस्थाही नसल्यामुळे रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: