बेळगाव तालुक्यातील काकती येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
यात्रेनिमित्त गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त गुरुवारी आंबील गाडे मिरवणूक पार पडली. शुक्रवारी सायंकाळी इंग्ळ्यांचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात बेळगावसह इतर ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, देवाचे दर्शन घेतले .
यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थानाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रा परिसरात विविध दुकाने, पूजेचे साहित्य, मनोरंजनात्मक स्टॉल्स उभारण्यात आले होते


Recent Comments