Belagavi

क्षुल्लक कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला

Share

गणेशपूर, बेळगाव येथे क्षुल्लक करा नातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्या व्यक्तीवर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. बेळगाव शहरानजीकच्या गणेशपूर येथे ही घटना घडली आहे.

प्रवीण पादके नामक व्यक्ती आज सकाळी गणेशपूर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका बेकरीतून ब्रेड आणण्यासाठी गेली होती. यावेळी बेकरीशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पार्किंगच्या कारणावरून प्रविणसोबत हुज्जत घातली. तुम्ही आमच्या घरासमोर बाईक का पार्क केली?” असा सवाल करीत त्याने प्रविणवर अचानक गंभीर हल्ला केला.

या हल्ल्यात प्रविण यांच्या चेहरा आणि नाकावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: