बागलकोटमधील नवनगर परिसरात परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अवैधरित्या गोमांसाची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. कंडक्टरच्या सतर्कतेमुळे ही बाब लक्षात आली असून तातडीने कारवाई करण्यात आली आहे.
तालिकोटहून हुबळीच्या दिशेने निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका प्रवाशाकडून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक होत असल्याचे नवनगर बसस्थानकात उघड झाले. बसमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही बाब कंडक्टरच्या लक्षात आली. त्याने तत्काळ त्या प्रवाशाला बसमधून खाली उतरवले आणि पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, दोन पोती गोमांस घेऊन आरोपी ऑटोरिक्षामधून पळून गेले. मात्र उर्वरित दोन पोत्यांतील गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात एक महिला संशयित असल्याची माहिती असून तिची चौकशी सुरू आहे. नवनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ही माहिती हिंदू कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली होती.


Recent Comments