Belagavi

केएलई संस्थेच्या बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

Share

केएलई संस्थेच्या बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 6 एप्रिल रोजी माजी विद्यार्थ्यांसाठी ‘अँलुमनी वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती हिरेमठ यांनी दिली.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्या डॉ. ज्योती हिरेमठ यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, आमच्या महाविद्यालयाला 2009-10 पासून कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ, हुबळी यांच्याकडून कायमस्वरूपी मान्यता मिळाली आहे. तसेच, यूजीसी 2(f) आणि 12(B) अंतर्गत मान्यता प्राप्त असून, दिल्लीतील बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडूनही मान्यता आहे. महाविद्यालयाने नॅकच्या तिसऱ्या फेरीत बी+ दर्जा मिळवला आहे. महाविद्यालयात कायदा आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक अध्यापन करतात. व्यावहारिक कायद्यांचे शिक्षण देण्यासाठी अनुभवी वकिलांना अतिथी व्याख्याते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्थापनेपासूनच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत आहे. महाविद्यालयाने दोन वेळा आंतरराष्ट्रीय परिषद तसेच राष्ट्रीय कायदा महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रदान करण्यासाठी महाविद्यालय विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळेच या संस्थेचे 25 हून अधिक विद्यापीठांमध्ये श्रेयनामांकन झाले आहे, असेही प्राचार्या हिरेमठ यांनी सांगितले.

Tags: