Belagavi

सचिन हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व व स्त्रीरोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

सचिन हॉस्पिटलच्या वतीने अपत्यहीन दांपत्य व महिलांमधील विविध आजारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वंध्यत्वावर विविध प्रकारचे उपचार कसे करता येतात, याबाबत तज्ज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत या शिबिरात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, टेस्ट ट्यूब बेबी, IUI, IVF, IMSI यासारख्या प्रगत उपचार पद्धतींबाबतही तपशीलवार माहिती देण्यात आली. शिबिरात डॉ. सचिन सुगाणावर यांनी स्त्री व पुरुष वंध्यत्वाची कारणे, औषधोपचार, टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान व त्यासोबत IUI, वीर्यपेढी, क्लीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे, IVF, ICSI, IMSI आणि Vitrification यासारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींची माहिती दिली.

गर्भाशयाच्या गाठी, पाळीच्या तक्रारी, बंद गर्भनलिका, स्त्रीबीजाच्या समस्या यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान व अल्प खर्चात उपचार सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, गर्भाशय काढण्याची गरज भासल्यासही अत्याधुनिक पद्धतीने कमी खर्चात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर समाधान व्यक्त केले.

या शिबिरात सहभागी नागरिकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आला. सचिन हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी म्हणून वंध्यत्व व स्त्रीरोगांवरील उपचारांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे ही समाजासाठी अत्यंत उपयुक्त बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Tags: