khanapur

निट्टूरच्या ग्रामपंचायत डेटा ऑपरेटरची आत्महत्या

Share

खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतीचे डेटा ऑपरेटर संजय कोळी यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतीमध्ये १९९७ पासून डेटा ऑपरेटर आणि लिपिक म्हणून कार्यरत असलेले संजय कोळी (वय ४५) यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरून बाहेर पडताना ते शेतात जात असल्याचं सांगून निघाले होते. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी नागुर्डा गावातील शेतात एका झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं आढळून आलं. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तत्काळ खानापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी खानापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला. संजय कोळी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Tags: