बंगळुरूमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री पोलीस पदक प्रदान सोहळ्यात एआयसीसी सचिव आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली.

बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री पोलीस पदक प्रदान सोहळ्यात माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपले पती एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना या सोहळ्यात सन्मानित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या.
याच भेटीत, खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून सहकार्याची विनंती त्यांनी केली. तसेच, काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले.
Recent Comments