मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयपीएस, एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना २०२४ सालासाठी मुख्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस ध्वज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना 2024 सालच्या मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या शरणागती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या हेमंत निंबाळकर यांच्या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
या समारंभात राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. एकूण २२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मुख्यमंत्री पदकाने गौरवण्यात आले.
प्रेक्षागृहात एडीजीपी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी, माजी आमदार आणि एआयसीसी कार्यकारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांची कन्या रकम्मा निंबाळकर उपस्थित होत्या.
अल्ताफ एम. बसरिकट्टी, इन न्यूज, खानापूर
Recent Comments