Belagavi

बेळगाव समगार हरळय्या संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश काळे बिनविरोध

Share

कर्नाटक राज्य समगार हरळय्या संघाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी गणेश काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.

बेळगाव शहरातील काकतीवेस येथे मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत गणेश काळे यांची एकमताने निवड झाली. या निवडणुकीसाठी राज्याध्यक्ष जगदीश बेटगेरी, उपाध्यक्ष परशुराम अरिकेरी आणि मंजुनाथ हंजगी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी गणेश काळे यांची बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचा सत्कार केला.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना गणेश काळे म्हणाले, समाजाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.

यावेळी समाजातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी भीमराव पवार, शंकरप्पा बेलगळी, लक्ष्मण काळे, संतोष होंगल, परशुराम तोरे, हिरालाल चव्हाण, आनंद तोरे, राजेंद्र बीडकर, किरण मुरगोड, देवेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: