Belagavi

बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेतर्फे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा

Share

बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेतर्फे जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

2 एप्रिल 2025 रोजी गंगाधर शानभाग हॉल, कॅम्प बेळगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून हुबळी येथे 11 व 12 एप्रिल रोजी होणाऱ्या राज्य नामांकन स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेतर्फे 10वी अधिकृत जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते होणार असून, सचिव जितेंद्र काकतीकर आणि उपाध्यक्ष रमेश आलगुडेकर हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत 182 कराटेपटू सहभागी होत असून खानापूर, अथणी, गोकाक आणि बेळगाव शहरातील खेळाडूंचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, अक्षय प्रमोजी, हरीश सोनार, नताशा आस्तेकर, विठ्ठल भोजगड, संजू गस्ती, अमित वेसाने आणि चंदन जोशी हे जबाबदारी पार पाडणार आहेत.

Tags: