Belagavi

यत्नाळांच्या पक्षात मी सहभागी होणार नाही… खोटे बोलणे – फसविणे हाच काँग्रेस नेत्यांचा डीएनए! : माजी आम. संजय पाटील यांची टीका

Share

भाजपात हिंदुत्व होते, आहे आणि कायम राहील, भाजपात आधीपासूनच हिंदुत्व होते, यत्नाळ यांना हिंदुत्वावर विश्वास होता म्हणूनच ते भाजपमध्ये होते, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केली.

आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी, आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तरी, कोणीही पक्षविरोधी काम केल्याचे एकही उदाहरण आपल्याला सापडणार नाही. भाजपमध्ये हिंदुत्व आहे. जर यत्नाळांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यात सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यत्नाळ सध्या संतापले असून संतापाच्या भरात ते भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपमध्ये आधीही हिंदुत्व होते, आताही आहे आणि उद्याही असेल, अशी प्रतिक्रिया माजी आम. संजय पाटील यांनी व्यक्त केली.

सरकार पाच गॅरंटींसाठी ५० विभागांना त्रास देणारे कार्य करत आहे. काँग्रेस कार्यकर्ते गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी मागासवर्गीय आणि दलित समुदायांवर अन्याय करत आहेत, तसेच विविध विभागांच्या अनुदानाचा दुरुपयोग करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारात पीएचडी केली आहे, असे त्यांनी म्हटले. हनीट्रॅप प्रकरणात सरकारचेच आमदार तक्रार करत आहेत. आता त्यांच्या घरातच आग लागली आहे. खोटं बोलण्याचे आणि फसवणुकीचे दुसरे नाव काँग्रेस आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी भाजपाचे नगरसेवक, माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: