Belagavi

चर्चसाठी सचिव लक्ष्मी हेब्बाळकरांनी केले ५० लाख रुपये मंजूर

Share

बेळगाव जिल्ह्यातील संत सेबास्टीयन चर्चच्या पुनर्निर्माणासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत.

बेळगावच्या संत सेबास्टीयन चर्चच्या पुनर्निर्माणासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ५० लाख रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विनंतीसह राज्य सरकारकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये जारी करण्यात आले आहेत.

मंगळवारी चर्चचे फादर युसेबियो फर्नांडीस आणि अन्य चर्च पदाधिकाऱ्यांनी मंत्री हेब्बाळकर यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Tags: