Bagalkot

उन्हाच्या तीव्रतेने घटप्रभा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली : शेकडो मगरींचे दर्शन

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील माचकनूर गावातील नदीकाठ आणि शेतात मगरींमुळे चिंता निर्माण झाली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील माचकनूर गावातील घटप्रभा नदीची स्थिती चिंताजनक बनली आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी घटलीआहे. यामुळे नदीच्या काठावर आणि आसपासच्या शेतजमिनीत मगरींचा वावर वाढला आहे.

वाढत्या मगरींच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून मगरींमुळे शेत आणि पिकं देखील धोक्यात आली आहेत. वनविभाग यावर कोणती उपाययोजना करेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: