Belagavi

बेळगावातील बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर यात्रोत्सव

Share

बेळगाव शहरातील बसवाण गल्ली येथे श्री बसवेश्वर गुढीपाडवा यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी आंबील गाड्यांची मिरवणूक पार पडली, तर आज सोमवारी इंगळ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव शहरातील बसवाण गल्ली येथे श्री बसवेश्वर गुढीपाडवा यात्रा उत्सव भक्तिभावाने सुरू झाला आहे. शनिवारी रात्री इंगळ्यांसाठी लाकडे आणून ठेवण्यात आली. रविवारी सकाळी पाटील गल्ली येथून आंबील गाड्यांची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक रामलिंगखिंड गल्ली, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, तसेच इतर प्रमुख मार्गांवरून पार पडली. त्यानंतर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर मंदिर परिसरात पाच प्रदक्षिणा घालून, लक्ष्मी मंदिराला भेट दिल्यानंतर ती परत श्री बसवेश्वर मंदिरात विसर्जित करण्यात आली.

आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: