बेळगावमध्ये भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, अर्चन आणि आरती पार पडली. तसेच, हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.

बेळगावच्या बापट गल्लीत असलेल्या पार्किंग परिसरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरात अभिषेक, पुष्पअर्चना आणि महाआरती पार पडली. यानिमित्ताने दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी सहभाग घेतला आणि भक्तिभावाने दर्शन घेतले. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भजने आणि भक्तिगीते गायनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
Recent Comments