इस्लाम धर्मीयांचा पवित्र सण ईद-उल-फित्र आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बेळगावमध्येही मुस्लीम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली.

संपूर्ण महिनाभर रोजा पाळल्यानंतर मुस्लीम बांधवांनी आज ईद-उल-फितर मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. काल चंद्रदर्शन झाल्यानंतर आज बेळगावमध्ये रमजान ईदचा उत्साह दिसून आला.
बेळगावच्या अंजुमन-ए-इस्लामच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नयीम खतीब यांनी खुतबा आणि हाफीज अब्दुल रजाक यांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना मुफ्ती अब्दुल अझीझ, मंजूर नोमानी आणि मुफ्ती झोहर यांसारख्या धर्मगुरूंनी सहभागी होत, जगभर सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी आमदार आसिफ (सेठ) शेख, माजी आमदार फिरोज (सेठ) सैत, फैजान (सेठ) सैत, नगरसेवक मुजम्मिल ढोणी, तसेच डीसीपी रोहन जगदीश यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ आणि माजी आमदार फिरोज (सेठ) सेठ यांनी उपस्थितांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत, संपूर्ण जगाला सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सामूहिक नमाज अदा करत परस्पर शुभेच्छांची देवाणघेवाण केली
Recent Comments