बेळगावची ज्युडोका साईश्वरी हिने उत्तराखंड मधील डेहराडून येथे कनिष्ठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक जिंकले आहे.

28 ते 31 मार्च 2025 दरम्यान झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत साईश्वरी हिने 78 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला. यापूर्वी गेल्या वर्षी कझाकस्तान आणि चीन येथे झालेल्या आशियाई ओपन ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये दोनदा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साईश्वरी हिने केरळ मध्ये झालेल्या दक्षिण विभागीय महिला राष्ट्रीय लीग -2023 मध्ये रौप्य पदक आणि बेळ्ळारी कर्नाटक येथे झालेल्या कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप -2023 स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. साईश्वरी ही बेळगाव जिल्हा क्रीडा उपसंचालक श्रीनिवास बी. यांच्या सहकार्याने प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय ज्युडो खेळाडू रोहिणी पाटील आणि कुतुजा मुल्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
Recent Comments