Belagavi

श्री गंगाधर राव देशपांडे यांची जयंती उत्साहात

Share

स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्ये, कर्नाटक सिंह म्हणून ओळखले जाणारे तथा खादी प्रचारक गंगाधरराव देशपांडे यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त रामतीर्थ नगर, श्री गंगाधर राव देशपांडे भवन येथे जयंती उत्सव आयोजित करण्यात आला.

या जयंती उत्सवाचे आयोजन श्री गंगाधर राव देशपांडे ट्रस्ट कमिटी आणि कुंदरणाड विकास संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुबोध कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून कन्नड व संस्कृती विभागाच्या संयुक्त संचालिका विद्यावती भजनत्री उपस्थित होत्या.

यावेळी नगरसेवक हणमंत कोंगाळी, निवृत्त पोलीस अधिकारी बेळगिरी, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. टुक्कार, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ मोहन माविनकट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: