महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मृती भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ या भवनाचे भूमिपूजन गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि त्या संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने हिंडलगा येथे स्मृती भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले दाम्पत्याच्या हस्ते यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजा करण्यात आली. यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपूजन व भूमिपूजन विधी पार पडला.
या वेळी माजी आमदार आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, 1 जून 1986 रोजी हिंडलगा, सुळगा, उचगाव आणि बेळगुंदी भागात एकूण 9 जणांनी सीमालढ्यात प्राणांची आहुती दिली. या संघर्षाचा इतिहास चित्ररूपाने मांडण्यासाठी स्मृती भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आर.एम. चौगुले म्हणाले की, सीमा वादासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या बलिदानाची ही भूमी आहे. त्याचा इतिहास स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर, मदन बामणे, सरस्वती पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Comments