बेळगावमध्ये एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यवसान थेट दाम्पत्यावर हल्ल्यात झाले असून, ही घटना कोल्हापूर सर्कलजवळील साईबाबा हॉटेलमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी वाहब सेरखान हे आपल्या पत्नी आणि लहान मुलासह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान, मुलगा चुकून एखाद्याच्या पायाला लागला. त्यावर संबंधित व्यक्तीने मुलाला रागावले. यावर सेरखान यांनी त्याला जाब विचारला, या साध्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि त्या व्यक्तीने थेट वाहब सेरखान यांच्या कपाळावर मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉटेलमध्ये काही वेळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


Recent Comments