बेळगावमध्ये भारत सरकार, हुडको आणि कर्नाटक सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या नवीन जिल्हा निर्मिती केंद्राचे उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगावातील गणेशपूर येथील लक्ष्मी टेकजवळ भारत सरकार, हुडको आणि कर्नाटक सरकार यांच्या प्रेरणेतून हे नवीन जिल्हा निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहे . आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते या नवीन जिल्हा निर्मिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुशीलम्मा एन., कर्नाटक राज्य बांधकाम केंद्राचे संचालक डॉ. नारायणगौडा के.एस. यासह प्रकल्प संचालक शेखरगौडा कुरडगी उपस्थित होते.


Recent Comments