Belagavi

यंदा मालिंगेश्वराचे भाविक झाले धन्य : श्वानाने केली पायी यात्रा पूर्ण

Share

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुगळीहाळ गावच्या मालिंगेश्वराच्या यात्रेदिनी झालेल्या पदयात्रेत सहभागी झालेल्या श्वानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

यात्रेकरिता हिरेहोळ या ओहोळाचे पाणी आणि विजापूर येथून पुष्पहार पदयात्रेद्वारेआणला जातो. या पदयात्रेत भाविकांसोबत चक्क एका श्वानाने सहभागी होत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

सौंदत्ती तालुक्यातील मुगळीहाळ गावात मालिंगेश्वराच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, यावर्षीही गावातील भाविकांनी पायी जाऊन हिरेहोळ या ओहोळाचे पाणी आणि विजापूर येथून पुष्पहार आणला. पायी यात्रेत यावर्षी एक श्वानही सहभागी झाला होता, या श्वानाने पायी यात्रा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
येथील भाविकांची मालिंगेश्वरावर अगाध भक्ती असून मालिंगेश्वराला ते महालिंगय्याचा अवतार1 मानतात.

Tags: