धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त बेळगाव येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा स्मरणार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने बेळगावात “धर्मवीर बलिदान मास” पाळण्यात करण्यात आला, ज्याचा समारोप आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात आला.

या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांचे विधिपूजन आणि पुष्पार्पण करण्यात आले. यानंतर, शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते मूक पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा एसपीएम रोड, शनिमंदिर, हेमूकलानी चौक मार्गे श्री शंभुरातीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली.

याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मंत्रोच्चारासह त्यांची प्रतिकात्मक चिता तयार करून विधीवत पूजन आणि दहन करण्यात आलं. या विधीचे पौरोहित्य श्री छत्रे गुरुजी यांनी केलं.

कार्यक्रमात कवलापूर प्रमुख श्री सुनील बापू लाड यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरित केलं.


Recent Comments